Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विंडीजचा विजय; मालिकेत १-१ ने बरोबरी

तिरुअनंतपुरम वृत्तसंस्था । लेंडल सीमन्स आणि एविन लुईसच्या फटकेबाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने भारतीय संघाचा दुसर्‍या टि-२० सामन्यात पराभव करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतले. कणर्र्धार पोलॉर्डचा विश्‍वास त्याच्या सहकारी गोलंदाजांनी सार्थ ठरविला. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अडखळत सुरूवात केली. लोकेश राहुल व रोहित शर्मा तंबूत परतल्यानंतर बढती मिळालेल्या शिवम दुबेने कर्णधार विराट कोहली सोबत डाव सावरला. यादरम्यान शिवमने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर कुणीही चांगली फलंदाजी न केल्याने भारतीय संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, पाठलाग करतांना विंडीजने जोरदार सुरवात केली. सलामीवीर लेंडल सिमन्सने या सामन्यात ६७ धावा केल्या. त्याला एविन लुईस, शेमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांनी चांगली साथ दिल्याने विंडीजने हा सामना आठ गड्यांनी जिंकला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेतला.

Exit mobile version