Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेतील विजेते खेळाडूंचे जल्लोषात स्वागत

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगावच्या संघाने घवघवीत यश प्राप्त केले आहे. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर सर्व खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

स्टुडन्‍ट ओलंपिक आसोसिएशचे जिल्हा सचिव योगेश चौधरी, जिल्हा सदस्य कोमल पाटील, किरण तायडे, आकाश पाटील, आरोही नेवे, विद्या कोळी, ऐश्वर्या पाटील, रितेश भारंबे यांनी स्वागत केले.

 

जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नेतृत्व केले. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील संघाच्या वतीने चोपडा येथील व्हॉलीबॉल संघातील मयूर पाटील, स्वप्नील माळी, प्रतीक नगराळे, दिग्विजय पाटील, सिद्धार्थ वाघ, हर्ष वाघ, वैभव डोके, विशाल कविरे, योगेश साळुंखे, अभिषेक पाटील आणि जयेश पाटील या खेळाडूंना सिल्व्हर मेडल मिळाले. तसेच ॲथलेटीक्स स्पर्धेत जळगाव जिल्हा संघातील चौगाव ता.चोपडा येथील विशाल पारधी ( ५ किमी.धावणे, गोल्ड मेडल), शुभम पाटील ( १oo मी. धावणे, ब्राँझ व २०० मी. धावणे, सिल्व्हर मेडल), वासुदेव कोळी ( १० किलो मीटर धावणे, (गोल्ड मेडल), उमेश धनगर ( ३०००मीटर लांब धावणे, ब्राँझ मेडल), मारवड ता.अमळनेर येथील कुंदन शिरसाठ ( ८०० मीटर लांब, ब्राँझ मेडल), सारबेटे ता.अमळनेर येथील आदित्य पाटील ( थाळी फेक, सिल्व्हर मेडल) मिळाले. असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी दिली. जळगाव जिल्हा स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशनचे कोच पवन पाटील सर (चोपडा),  चेतन पाटील सर, सागर पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.  दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्हा टीमच्या या यशाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक करून स्वागत होत आहे.

 

Exit mobile version