Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवस्मारक व राणी लक्ष्मीबाई स्मारक येथे छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे साप्ताहिक शिवदुग्धाभिषेक

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरात ११ मार्च रोजी सकाळी आठ वाजता छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठान पारोळा ह्या संघटनेतर्फे शिवदुग्धाभिषेक हा उपक्रम राबविला गेला. हा उपक्रम दर सोमवारी गेल्या दीड-दोन वर्षांपासून राबविला जातो. ह्या उपक्रमाचे आयोजन निलेश मराठे, आकाश ठाकुर, श्रीराम भोई, ज्ञानेश्र्वर माळी यांनी केले आहे.

११ मार्च रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी महाराणी राणीलक्ष्मीबाई यांच्या स्मारक येथे दुग्धाभिषेक करून पुजा माल्यार्पण केले गेले. यावेळी मोतीलाल सोनवणे, डॉ साहेब,श्रीराम भोई, किशोर चौधरी, राज चौधरी, विजय चौधरी, निलेश मराठे, कल्पेश मराठे, ज्ञानेश्र्वर माळी, सौरभ पाटील, शुभम पाटील, दिपक भोई, ललित लोहार, दिपक भोई, तुषार भोई, मिलिंद चौधरी,वेदांत चौधरी, सह सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version