आठवडे बाजारातून दुचाकीची चोरी

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आठवडे बाजारातून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल भावसिंग भिलाला (वय-२६) रा. मोहमांडली ता. रावेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. ८ जून रोजी दुपारी ३.३० वाजता अनिल हा दुचाकी (एमएच १९ डीई ५०७४) ने फैजपूर शहरात कामानिमित्त आला होता. शहरातील आठवडे बाजरातील ओमक्लॉथ समोर त्याने दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. साडे चार वाजता दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी सोमवारी १३ जून रोजी रात्री १० वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र मोरे करीत आहे.

Protected Content