Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार : सुमित पाटील

257e5c1e b536 4b06 853a 285a76cd5ae4

 

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, शिंदाड येथे जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर गुलाल आम्हीच उधळवू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे युवानेते सुमित किशोर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांचे चिरंजीव युवासेनेचे सुमित पाटील यांनी ग्रामीण भागात प्रचाराचा धडाका सुरु केला आहे.

 

आज सुमित पाटील यांची पाचोरा तालुका येथील वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, शिंदाड येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत रॅली झाली. जनतेतून त्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. त्यांच्या या प्रचार दौऱ्यास मिळालेला उत्सुफूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर ‘गुलाल आम्हीच उधळवू’, अशी प्रतिक्रिया सुमित पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली. या दौऱ्यात त्यांच्या सोबत युवासेनेचे उपजिल्हायुवाधिकारी अजय जैस्वाल, समाधान पाटील, युवासेना शहरप्रमुख संदीपराजे पाटील, मोरेश्वर गोहिल, डॉ.शेखर पाटील, भागवत पाटील, शिवाजी परदेशी, सूरज जगताप, गोपाल पाटील, भगवान पांडे, कृष्णा पाटील, विश्वास पांडे, कैलास बापु, दिनकर पाटील, दीपक मोरे, जितू शिंपी, वसंत गवळी, शांताराम शिंदे, सोपान ठोमरे, तेजराव पाटील (डॉन), संजय धुमाळ, पुंडलिक बापूराव पाटील, तसेच गावातील सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version