Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समृद्धी महामार्गासाठी अजून वाट पहावी लागणार

नागपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सोमवार, दि.2 मे रोजी करण्यात येणार होते मात्र आता हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

या लोकार्पण सोहळ्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तयारीही सुरू केली होती मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात प्रमाणे हा उद्घाटन सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

या महामार्गावर विविध ठिकाणी वाईल्ड लाईफ ओव्हरपास तयार करण्यात आले असून एका ठिकाणी अपघातामुळे आर्च पद्धतीचा ओव्हरपासच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ते ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होऊ शकणार नसल्याने  आणि तज्ज्ञांनी आता नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचे सुचविल्याने यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते सेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे मुंबई ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते नागपूरह अवध्या ४ तासांत पोहोचता येणार आहे. तर मुंबई ते नागपूर हा प्रवास ८ तास आणि नागपूर ते शिर्डीचा प्रवासही ५ तासांचा असणार आहे.

Exit mobile version