Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आम्ही पण युपीत कार्यालय उघडू – अजित पवार

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत युपी सरकारचे कार्यालय उघडणार असे म्हटले होते, यावर कोणी कुठे कार्यालय उघडावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही पण युपीत कार्यालय उघडू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

अजित पवार म्हणाले कि, उत्तर प्रदेश कार्यालय मुंबईत काढणार यावर घाबरण्याचे वा गैरसमज करून घेण्याचे काहीच कारण नाही. दिल्लीत महाराष्ट्र सदन आहे, नवी मुंबईत विविध सदने आहेत, भारतात कोठेही कार्यालय काढता येते.

आगामी  निवडणुकीत आघाडी होणार का?

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत. यात महाविकास आघाडी एकत्र लढविणार कि कसे? कारण नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने खंजीर खुपसला से भंडारा निवडणुकीच्या माध्यमातून म्हटले आहे, यावर पटोले यांचे विधान हास्यास्पद आहे. ते कोणत्या पक्षातून आलेत. मग भाजपाने असे म्हणायचे का? काहीतरी प्रसिद्धी बस दुसरे काही नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक आघाडीबाबत शरद पवार यांनी बैठक घेतली. मात्र स्थानिक पातळीवर तिथले आमदार, खासदार, पदाधिकारी निर्णय घेतील असेहि  पवार यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या सूचनांचे पालन करू 
दरम्यान सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचे कलम निरस्त केले असून या कलमाचा वापर करू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे खा. नवनीत राणा आणि आ.रवि राणा यांच्यावर राज्य सरकारने राजद्रोहाचे जे कलम लावले आहे, त्याबाबत सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला सूचना मिळतील, त्यानुसार त्यांच्या सूचनांचे पालन आणि अंमलबजावणी करीत पालन केले जाईल, असेही पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Exit mobile version