Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले; खडसेंचा भाजपला घरचा आहेर

khadse e1550572684596

मुंबई (वृत्तसंस्था) आम्ही ज्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यांच्यासोबत सरकार बनविण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादीसोबत जायलाच नको होते. परंतू कदाचित सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले असतील, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

 

राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिले होते. परंतू दुर्दैवाने दोघांचे सरकार बनू शकले नाही. भाजप ज्यांच्या विरुद्ध लढून जिंकली. त्यांच्याच सोबत सरकार बनविण्याचा प्रकार चुकीचा होता. मी राहिलो असतो, तर किमान २५ जागा वाढल्या असत्या. ज्यांनी एवढा मोठा सिंचन घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत सरकार बनविण्यापेक्षा कारवाई अपेक्षित होती. परंतू कदाचित सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले असतील, असेही खडसे म्हणाले.

Exit mobile version