Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आपल्याला जळणारे नव्हे हसणारे अमळनेर हवे : बी. जी. शेखर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कुणीही अफवांना बळी न पडता सलोखा बाळगावा, आपणा सर्वांना जळणारे नव्हे तर हसणारे अमळनेर हवे आहे ! असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांनी केले. ते येथील शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

अलीकडेच झालेल्या जातीय तणावाच्या पार्श्‍वभूमिवर शहरातील हॉटेल मिड टाऊन येथे पोलीस प्रशासनातर्फे शांता समितीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डीआयजी बीजी शेखर पाटील म्हणाले की, त्रिपुरा येथे अरब देशातील व्हीडिओ सोशल मीडिया वर आल्यावर तेथे दंगल झाली व तो बनावट व्हीडिओ इकडे मालेगाव ला व्हायरल झाला त्यामुळे तेथे दंगल झाली. या चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्यामुळे सर्व सामान्य माणसाचे यात नुकसान झाले. दंगली झाल्यावर असे म्हटले जाते की पोलिसांचे काय नुकसान झाले ? पण आमच्या अंतकरणातील जी आग पेटलेली असते ती कधीच शांत होत नसते जेव्हा सगळा समाज शांत होईल तेव्हाच ती पेटलेली आग शांत होईल असे आम्हाला वाटते. दंगलीमुळे अमळनेरचे नावलौकिक कमी झाले ते पुन्हा आणायला हवे. याला त्याला दोष देण्यात अर्थ नाही स्वतःच स्वतःचे विश्लेषण करायला हवे. ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या शहराचा विकास झाला नाही.

बीजी शेखर पुढे म्हणाले की,तरुणावर असलेला एक गुन्हा त्याचे पुढील आयुष्य बरबाद करून टाकतो. ’देशाची सुरक्षा, आपली सचोटी ,एक कॅमेरा पोलिसांसाठी …! हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे . आम्हाला जळणारे अमळनेर पहायचे नाही अमळनेरकरांच्या चेहर्‍यावर हास्य पहायचे आहे. असे प्रतिपादन नासिक परीक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक बि. जि. शेखर-पाटील यांनी केले.

त्या पूर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार ,आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार डॉ बी.एस. पाटील, स्मिता वाघ, अतुल ठाकूर,इम्रान खाटीक , रणजित शिंदे,शकील काझी, लालचंद सैनांनी,प्रवीण पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडेकर, न.पा.चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर (अमळनेर), ऋषीकेश रावले (चोपडा), नायब तहसीलदार अमोल पाटील,पारोळा पोलीस निरिक्षक वाकोळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सूत्र संचलन संजय पाटील यांनी केले व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी आभार मानले. याावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे , दीपक काटे यांना सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version