Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाबरी पाडणारे आम्हीच आहोत- संजय राऊत

 

मुंबई प्रतिनिधी । कंगनाने शिवसेनेला बाबर म्हटल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी बाबरी पाडणारे आम्हीच असल्याचे सांगत तिने नरमाईची भूमिका घ्यावी असे बजावले आहे.

आज कंगना राणावतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

खासदार संजय राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, आज करण्यात आलेल्या कारवाईचं उत्तर फक्त महापालिका आयुक्तच देऊ शकतात. जर कुणी कायदा तोडत असेल, त्याच्यावर कारवाई केली जाते. अशावेळी पक्षाकडे माहिती असावी हे गरजेचं नाही. शरद पवार यांनी काय म्हटलं आहे, याबद्दल मला माहिती नाहीये. माझ्यासाठी अभिनेत्री सोबतचा वाद संपला आहे. विधानसभेत कंगना राणावतविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. गृहमंत्र्यांनीही याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कायदा काम करत असताना माझं बोलणं बरोबर नाही, असं राऊत म्हणाले.

कंगनानं केलेल्या बाबर सेना उल्लेखावरून संजय राऊत म्हणाले,बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय म्हणत आहे. कंगनाशी माझं वैर नाही. ती एक कलाकार आहे. मुंबईत राहते. पण ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे. ती कदापि सहन करण्यासारखी नाही. कंगनानं जर आपलं म्हणणं मागे घेतलं, तर वाद राहणारच नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version