Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेच्या उमेदवारांसाठी आम्हीही प्रयत्न केला ; मुख्यमंत्री आमचाच : ना. गिरीश महाजन

girish mahajan
मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीही प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांची भूमिका आणि भावना मुख्यमंत्री भाजपचा राहावी, अशी आहे. निकाल राज्यातले बघितले तरी कोणाचा मुख्यमंत्री असावा, हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही पुन्हा एकदा भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे म्हटले आहे.

 

मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ लागलेली दिसत आहे. मध्यंतरी प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा मुख्यमंत्री असेल असे म्हटले होते. त्यावेळी शिवसेनेकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. परंतू जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही भाजपचाच मुख्यमंत्री म्हटले आहे. मात्र, शेवटी कोणताही वाद होऊ नये म्हणून अंतिम निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असे म्हणत सावरुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर दरम्यान, दोन्ही काँग्रेसला भाजपने टोला लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे भरकटलेल जहाज असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Exit mobile version