Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडीओ)

aatmadahan

जळगाव प्रतिनिधी । थकीत वेतन मिळत नसल्याने वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍याने आज सकाळी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कंपनी योग्य पध्दतीत वेतन देत नसल्याचा आरोप करून कालपासून संप सुरू केला आहे. दरम्यान, आज सकाळी कचरा गाड्यांचा डेपो असणार्‍या ठिकाणी आज सकाळपासून कर्मचार्‍यांनी संप सुरू केला आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी संप करणार्‍या काही कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली. याप्रसंगी काही कर्मचार्‍यांसोबत त्यांची शाब्दीक चकमक झाली. यात राजू परदेशी या कर्मचार्‍याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी त्यांना आवरल्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, सकाळी अकरा वाजेपर्यत आपले थकीत वेतन न मिळाल्यास आपण आत्मदहन करणारच असा पवित्रा राजू परदेशी यांनी घेतला आहे.

Exit mobile version