Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आज पुन्हा जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा होणार एक दिवस उशिरा

jalgaon municipal corporati

जळगाव (प्रतिनिधी ) शहरात वाघुर धरणावरून पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वाढत असून आज पून्हा दुपारी अडीच वाजता मेहरुण रोडवरील घुगे-पाटील करोसिया जवळ जलवाहिनी फुटली.  त्यामुळे एका तासात मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. तातडीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतू, व्हॉल दुरुस्तीसाठी आधीच एक दिवस उशिरा पाणीपुरवठा अजून जलवाहिनी फुटल्याने पून्हा एक दिवस उशीराने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ढकललेला आहे.

 

महापालिकेतर्फे वाघुर जलवाहिनीला लागलेल्या मोठ्या गळती दुरुस्त करण्याची मोहीम दोन महिन्यापूर्वी हाती घेतली आहे. पंधरा दिवसापासून जलवाहिनीवरील व्हॉल गळतीचे अनेक ठिकाणी कामे करण्यात आली. त्यात शहराचा पाणीपुरवठा आज बंद करून हॉटेल कस्तुरी जवळ एअर व्हॉलचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले होते. हे काम पूर्ण होत नाही तोच मेहरुण रस्त्यावरील घुगे-पाटील केरोसीन समोर मुख्य 1200 मीमी व्यासाची ड्रेनेजची जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी खालच्या बाजूने फुटल्याने 5 मीटरचा लोखंडी पाईप टाकून जोडावा लागणार आहे. या कामाला उशीर लागणार असल्याने शहराचा उद्या होणारा पाणीपुरवठा होणार नसल्याची शक्‍यता आहे. तसेच एक दिवस पुढे पाण्याचे वेळापत्रक ढकले जाण्याची शक्‍यता आहे. उद्या लवकर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास शहरातील काही भागात पाणी पुरवठा होण्याची शक्‍यता पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी माहिती दिली.

Exit mobile version