Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लक्ष्मीनगर परिसरातील नागरिक पाण्यासाठी आक्रमक

WhatsApp Image 2019 05 15 at 6.36.46 PM 1

WhatsApp Image 2019 05 15 at 6.36.46 PM 1

WhatsApp Image 2019 05 15 at 6.36.46 PM

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शहरातील मु.जे.महाविद्यालयामागील लक्ष्मी नगर परिसरात ५ दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेऊन रोष व्यक्त केला. याभागातील नगरसेवकांना बोलविण्यात आले असता त्यांनी आधिकऱ्याना बोलविल्यावर नागरिकांनी अधिकाऱ्याना जाब विचारला.

मागील महिन्याभरापासून पाण्याची समस्या लक्ष्मी नगरात भेडसावत आहे. आज ५ दिवस झाले पाणीपुरवठा झालेला नव्हता. पाणीपुरवठा करतांना भेदभाव केला जात असल्याचा आरोपही नागरिकांचा आहे. दरम्यान, मागील आठवड्यात नगरसेवक नितीन बरडे, मनपाचे पाणी पुरवठा अधिकारी शिरसाठ यांनी प्रत्यक्ष येऊन समस्या जाणून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठवडा उलटूनही समस्या जैसे थे आहे. मंगळवारी मनपाचे नवीन व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे नियमित पहाटे २. ३० वाजता ऐवजी सकाळी ११ वाजता पाणी येणार होते. ११ वाजताही पाणी न आल्याने लक्ष्मी नगरातील नागरिक जमा झाले. यावेळी त्यांनी सर्व चारही नगरसेवकांना बोलावले. चौघा नागरसेवकांपैकी फक्त उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे ह्यांनी दाखल घेऊन भेट देऊन अधिकाऱ्यांनाही बोलाविले.याठिकाणी नागरिकांनी समस्येबाबत आक्रमक भूमिका घेऊन महिन्याभरापासून पाणीटंचाईच्या साम्येसाला तोंड देत असल्याचे निदर्शनास आणून दिले. धक्कादायकबाब म्हणजे याच परिसरात इतर घरांना उच्च दाबाने व्यवस्थित पाणी पुरवठा होत आहे. मात्र आमच्याकडे का व्यवस्थित पाणी येत नाही ? असा जाब विचारला. पाणीपुरवठा अधिकारी शिरसाठ यांची बदली झाल्यावर त्यांच्याजागी आलेले मिलिंद जगताप यांचा पहिलाच दिवस होता. यावेळी अधिकारी व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. नगरसेवकांनी नागरिकांची बाजू ऐकून घेत गुरुवारी पाईपलाईन टाकून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे

Exit mobile version