Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिजाऊ नगरात पाण्याची पाईप लाईन फुटली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील गिरणापंपींग रोडवरील जिजाऊ नगरात पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे जळगाव महापालिकेचे साफ दुर्लक्ष होत आहे. वारंवार तक्रार देवूनही याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक स्थानिक नागरिकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते एप्रिल २०२१ मध्ये जलसिंचन योजनेच्या माध्यमातून वाघूर धरणावरून वाघनगरसह जिजाऊ नगर इतर परिसरात नव्याने पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा केला जात आहे. जिजाऊ नगर, वाघ नगर व इतर कॉलन्या या महापालिका हद्दीत असल्या तरी त्याचा समावेश जळगाव ग्रामीण मतदार संघात होतो. जिजाऊ नगरातील महादेव मंदीरासमोरील रस्त्यावरून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली होत. ही पाईपलाईन मुख्य पाईपलाईन आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ही पाईपलाईन महादेव मंदीराजवळील रस्त्यावर फुटल्याने हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशी यांनी वार्डातील नगरसेवक आणि जळगाव महापालिका प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्या संदर्भात माहिती देण्यात आली होती. परंतू अद्यापपर्यंत तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही. लवकरात लवकर पाईपलाईन दुरूस्ती करावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशी चिंधू पाटील, रत्ना बारी, अरुण पाटील, भास्कर शिरसाठ, मंगलबाई पाटील, भावना बारी, करुणा बढे, नरेंद्र पाटील पी. तडवी, जी. लोहार यांनी दिला आहे.

Exit mobile version