Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रात्रभरातून एमआयडीसीचा पाईप जोडूनही नव्याने गळती सुरूच ! ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव बसस्थानकावरील एमआयडीसीच्या फुटलेल्या पाईपलाईनचे काम रात्रभर करूनदेखील पुन्हा गळती झाल्याचे दिसून आले आहे.

याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गाला लागून असणार्‍या एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्यामुळे काल लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने याबाबत वृत्त देताच औद्योगिक वसाहत कार्यालयाने तातडीने दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. मात्र संबंधीत जलवाहिनी मोठ्या प्रमाणात तुटली असल्यामुळे गळती थांबली नाही. परिणामी, एमआयडीसीच्या पथकाला रात्रभर काम करावे लागले. यासाठी चौपदरीकरणासाठी वापरण्यात येत असलेली सामग्री देखील वापरण्यात आली. यामुळे रात्री उशीरा पाणी गळती थांबवण्यात यश आले. मात्र आज सकाळी पुन्हा एकदा या जलवाहिनीला गळती लागल्याचे दिसून आले आहे. आता मुख्य पाईपलाईन दुरूस्त करण्यात आली असली तरी यातील एका व्हॉल्व्हमधून पाणी वाहत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे एमआयडीसीचा गलथानपणा पुन्हा उघड झाला आहे.

पहा : जलवाहिनी लिकेजबाबतचा हा व्हिडीओ.

Exit mobile version