Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुजरातमधील पाणी दूषितच

 

गांधीनगर : वृत्तसंस्था । राज्यात कुठेही पिण्याच्या पाण्यामध्ये रसायनांचा अंश नसल्याचा गुजरात सरकारचा दावा चुकीचा असल्याचे कॅगने म्हटले आहे. प्रयोगशाळेच्या निरीक्षणांसह कॅगचा अहवाल शुक्रवारी राज्याच्या विधानसभेसमोर ठेवण्यात आला.

२०१५-१६मध्ये सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी केलेल्या १.३० लाख पाण्याच्या नमुन्यांपैकी तब्बल २० हजार नमुने रसायनांच्या चाचण्यांमध्ये दूषित असल्याचे आढळले. त्यानंतरच्या वर्षातही अशाच प्रकारची निरीक्षणे नोंदवण्यात आली होती. कॅगचा २०१७-१८चा गुजरातच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेबाबतचा अहवाल शुक्रवारी, पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहासमोर ठेवण्यात आला.

विशिष्ट रसायनांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो, अर्सेनिकमुळे कॅन्सर, फ्लोराइडमुळे फ्लुरांसिस, नायट्रेटमुळे रक्तातील ऑक्सिजन धारण करण्याची क्षमता कमी होते, त्यातून मेंदूवर परिणाम होतो; रक्तातील अतिरिक्त लोहामुळे मधुमेह, संधिवातासारखे विकार जडतात.

गुजरातने २०१६ मध्येही पिण्याचे पाणी दूषित नसल्याचा दावा केंद्र सरकारकडे केला होता, २०१३ ते २०१८दरम्यान ६.२९ लाख नमुने तपासले. त्यातले १.१५ लाख म्हणजे सुमारे १८.३० टक्के नमुने दूषित निघाले. त्यात फ्लोराइड , नायट्रेट आणि विरघळलेले क्षार अतिरिक्त प्रमाणात होते.

छोटाउदेपूर, दाहोड, बनसकंथा, पंचमहाल आणि बडोदा या भागातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण मोठे होते, दाहोड, छोटाउदेपूर, बनसकंथा आणी खेडा या भागात फ्लोराइड अतिरिक्त प्रमाणात आढळले.

Exit mobile version