Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वॉटर ग्रेस कंपनीवर कारवाई करा ; प्रशांत नाईक

जळगाव, प्रतिनिधी | वॉटर ग्रेस कंपनी, नाशिक यांच्यावर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव महापालिकेतर्फे २१ ऑगस्ट २०१९ पासुन शहरासाठी नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनी यांना कचरा उचलण्याचा मक्ता देण्यात आला आहे. या कंपनीने लावलेले कर्मचारी यांच्या कड्न महामार्गावरील चंद्रकांत स्वाँ मिल जवळ कचरा न उचलता मातीचे ढिगारे टाकून वजन वाढविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच प्रमाणे इतर भागात ही हा प्रकार होत असल्याचे नाकारता येत नसल्याचेही नाईक यांनी पुढे म्हटले आहे. या संदर्भात नाईक यांनी तक्रारीच्या माध्यमातुन दि. २४ ऑगस्ट रोजी व्हॉट्स अॅप व्हिडीओ दिला आहे. शहरातील कचरा न उचलता अक्षरशः मातीचे ढिगारे उचलुन वजन वाढावे म्हणुन असे प्रकार जळगाव शहरातील नागरीकांचे व नगरसेवकांचे निदर्शनास आले आहे. मक्तेदार यांनी मनपाच्या अटी शर्तीचा भंग करुन फसवणुक करण्यात आली आहे. मक्तेदार यांचेवर अटी शर्तीचा भंग केल्याने त्यांचेवर मनपा प्रशासनाने कारवाई करुन असे कृत्य होणार नाही, याबाबत त्यांना नोटीस देवुन सुचना देण्यात यावी. यापुढे भविष्यात असे काही प्रकार होणार नाही. याबाबत प्रशासनाने गांभिर्याने दक्षता घ्यावी अशी विनंती केली आहे.

Exit mobile version