Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वसुंधरा गोसेवक परिवाराचा वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा संकल्प

bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । येथील वसुंधरा गोसेवक परिवारातर्फे आपल्या आप्तइष्ट नातेवाईक वा मित्रपरिवार यांचा वाढदिवसाला वृक्ष (रोप) भेट देवून वृक्षरोपण व संवर्धन ही संकल्पना राबविण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने आज 20 जुलै शनिवार रोजी दुपारी स्थानिक टीव्ही टॉवर मैदानावर याची सुरुवात केली.

सर्वत्र सिमेंटची जंगले बनत असल्याने झाडाची सर्रस कत्तल केली जाट आहे. यामुळे वृक्षाचे संवर्धन होत नाही ओघाने त्याचा पर्यावर्णावर परिणाम होऊन संतुलन बिघडत आहे यामुळे पावसावर परिणाम होऊन पावसाने दडी मारली आहे. झाडांच्या सवर्धनामुळे पर्यावरणातील समतोल राखण्यास निश्चितच मदत होईल याकरिता वसुंधरा गो सेवक परिवारातील जेष्ठ नागरिक सुरेश बडगुजर यांच्या वाढदिवसानिमित्त बडगुजर काका यांना वसुंधरा गोसेवक परिवारातर्फे डॉ भारत महाजन, पत्रकार उज्वला बागुल, रोहित महाले यांच्याहस्ते रोप भेट देण्यात आले व त्याचे संगोपन त्यांनी करावे असे आश्वासन घेण्यात आले. प्रत्येकाने आपल्या परिवारातील सदस्यांचे वाढदिवस हे पाश्चिमात्य पद्धतीने न साजरे करता वृक्षरोपण व सवर्धनाने करावे असे आवाहना डॉ भरत महाजन यानी केले. तर सर्व सेवाभावी संस्थासह सर्व नागरिकांनी वृक्षरोपण व संवर्धन हे आपले नैतिक कर्तव्य व जबाबदारी समजून सहकार्य करावे जेणे करून दुष्काळ सदृश्य स्थिति वर मात करता येईल असे मत पत्रकार उज्वला बागुल यांनी व्यक्त करीत गोसेवकांचे कार्याची स्तुती केली. सत्कारमुर्ती बडगुजर काका यांनी वसुंधरा गोसेवक परीवाराच्या या उल्लेखनीय उपक्रमाचे कौतुक करून 61 वर्षाच्या कार्यकाळात एकदाही वाढदिवस साजरा झाला नसून वसुंधरा गोसेवक परीवाराने आमच्यासह भावी पीढिची व पर्यावरण रक्षणाची दखल घेतली घेतल्याने आनंद व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी गायत्री माता परिवारातील विजयालक्ष्मी अरोरा, पुष्पा पाटील पत्रकार उज्वला बागुल, पर्यावरण प्रेमी चंद्रशेखर जंगले, गोसेवक सुरेश बडगुजर, डॉ. भरत महाजन, जीतु जाट, सर्पमित्र किरण पाटील, राहुल पुरी, रोहित महाले, पवन बाक्से, राकेश चौधरी, निलेश बोरणारे, विशाल टाक, कातिँक बऱ्‍हाटे, गुणेश चौधरी, मोहित बोरोले, कीर्तिश बऱ्‍हाटे, साहिल कुलकर्णी, गिरीश प्रधान, परिसरातील नागरिक तसेच वसुंधरा गोसेवा परिवार सदस्य व गोप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version