Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा; पिकांची काळजी घेण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२३ या कालावधी दरम्यान मध्यम ते हलका स्वरुपाचा पावसाचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान आपल्या पिकांची व शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जिल्हयातील पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेल्या पिकांची जसे कापूस, मका, ज्वारी इत्यादी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. तसेच उघड्यावरील धान्य योग्यरित्या झाकून ठेवावे, पावसापूर्वी शक्य झाल्यास कापूस बोडांची वेचणी पूर्ण करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करुन जर प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर असल्यास विविध योग्य त्या उपाययोजना कराव्यात, हवामान अंदाजावर आधारीत कृषी सल्ला व हवामानाचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल ॲपचा वापर करावा, तसेच शेतकरी बंधूंनी मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरीता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

Exit mobile version