Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंधारी-तळेगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा

34 342516 wa 23 narrow road ahead traffic information signs narrow road sign

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अंधारी-तळेगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी मौजे अंधारी येथील ग्रामस्थांनी केली असून त्याबाबत लवकर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका लेखी अर्जाद्वारे दिला आहे.

 

या अर्जात म्हटले आहे की, अंधारी तांडा येथील काही रहिवाशांनी अतिक्रमण करून घरे बांधल्याने या रस्त्याची रुंदी अतिशय कमी झाली आहे. त्यामुळे येथे रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. चारचाकी वाहनांना नेहमी येथे अडथळा होत असून प्रसंगी मोठे व गंभीर
स्वरुपाचे अपघात होऊन प्राणहानी होण्याची शक्यता आहे. या अर्जाच्या प्रती जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Exit mobile version