सावधान : जिल्ह्यात आज दिवसभरात ६ कोरोना रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ६ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा असल्याची दिसून आले आहे.

जळगाव जिल्हा कोवीड प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात आत दिवसभरात जळगाव शहरात ४, भुसावळ तालुक्यात १ आणि चोपडा तालुक्यात १ असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७१९ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात २३ सक्रिय रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Protected Content