Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कांताई बंधार्‍याला कठडे बसवून धोक्याची सूचना लावा- पियुष पाटील ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीवर असणार्‍या कांताई बंधार्‍याचे काढून घेण्यात आलेले कठडे पुन्हा बसवावेत, तसेच येथे धोक्याची सूचना देणारा बोर्ड लावावा अशी मागणी पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरापासून मोहाडी गावाजवळ असलेले कांताई डॅम आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधार्‍याच्या पुलावरून आजूबाजूच्या गावाचे लोक वापरत असतात. तसेच त्या ठिकाणचा असलेला निसर्ग व बंधार्‍यामुळे अडवले गेलेल्या पाण्यामुळे त्या नदी पात्राला मोठ्या तलावाचे स्वरूप आलेले दिसून येते. हे पाहण्यासाठी जळगाव शहरापासून तसेच शहराजवळच्या तालुक्यात मधून मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी सहपरिवार निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात यामुळे या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते.

दरम्यान, कांताई बंधार्‍याच्या पुलाला याआधी कठडे असल्याने आजूबाजूच्या गावातले लोक शेतकरी शहरातील त्याठिकाणी जाणारे तरुण – तरुणी बिनधास्तपणे तो पूल पार करत असत. पण सध्या पावसाचे पाणी पडल्याने पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या बंधार्‍याचे काही (एक फूट) दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे पुढे देखील मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी वाहत आहे. परिणामी, काही तरुण-तरुणी उत्साहाच्या भरात नदीपात्रात उतरून सेल्फी फोटो काढत असल्याचे दिसून येत आहे. यातच गेल्या आठवड्यात दोन तरुणांचा पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला. यात या तरुणांची चूक असावी असे म्हटले जाईल . पण, त्या ठिकाणी सतर्कते साठी एकही फलक लावलेला नाही. तरी तात्काळ त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यात पुढे म्हटले आहे की, आपण तात्काळ कांताई बंधार्‍याला स्पॉट व्हिजिट द्यावी. तसेच प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणच्या सत्य परिस्थितीचा आढावा घ्यावा हीदेखील विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण केलेली आहे. आणि तात्काळ या पुलाला कठड़े बसवण्याच्या संबंधितांना सूचना करण्यात याव्या जेणे करुण एखादी मोठी जीवित हानी होण्यापासून वाचवावे याबाबत लेखी पत्र जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात आलेले आहे.

खालील व्हिडीओत पहा या संदर्भात पियुष पाटील नेमके काय म्हणाले ते ?

Exit mobile version