Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा नगरपरिषदची प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

वरणगाव-दत्तात्रय गुरव । चोपडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आज आरक्षण जाहीर  करण्यात आले. चोपडा नगरपरिषदेच्या १५ प्रभागातून ३१ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.

चोपडा नगरपरिषदेच्या १५ प्रभागातील ३१ जागांपैकी अनुक्रमे ३ ब-अनु. जाती, ४ अ- अनु.जाती महिला, ५ ब-अनु.जमाती आणि १५ अ- अनु. जमाती महिला असे ४ जागांवर आरक्षण काढण्यात आले. तर अन्य प्रभागातील उर्वरित जागांवर सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले.

संसर्ग प्रादुर्भावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार या निवडणुकांसाठी आज जिल्ह्यातील १५ नगरपालिका सभागृहात प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात चोपडा नगरपालिकेच्या श्रीमती आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृह येथे १५ प्रभागांतील ३१ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

यात अनुसूचित जाती ३-ब, अनुसूचित जाती महिला ४-अ, अनुसूचित जमाती ५-ब आणि अनुसूचित जमाती महिला १५-अ असे चार प्रभागात ४ जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तर  १-अ ते १४-अ आणि १५-ब सर्वसाधारण महिला आणि १-ब ते १४-ब आणि १५-क सर्वसाधारण असे १५ प्रभागातील ३१ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले चोपडा नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी म्हटले आहे.

Exit mobile version