Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू चोरी प्रकरणातील तलाठ्यावर हल्ला करणाऱ्या चौघांना शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । वैजनाथ शिवारातील गिरणा नदीतून चोरटी वाहतूक करतांना महसूल अधिकाऱ्यावर हल्ला व जीठे ठार मारण्याचा प्रयत्न आणि वाळूची चोरटी वाहतूक केल्या प्रकरणी दोन ट्रक्टरचालकासह इतर दोघांना शिक्षा व दंड ठोठवण्यात आला आहे.

थोडक्यात हकीकत
जळगाव तालुक्यातील वैजनाथ शिवारातील गिरणा नदीपात्रात 13 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 9.40 वाजेच्या सुमारास दोन वाळूने भरलेले ट्रक्टर मनाई असतांना चोरून नेत होते. यावर प्रतिबंध म्हणून महसुल विभागाचे रिंगणगावचे तत्कालीन तलाठी अनिल प्रभारक सुरवाडे व सहकारी घनश्याम सुधाकर पाटील यांनी दोन्ही ट्रक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला होता. यात आरोपी ट्रक्टर चालकाने घनश्याम पाटील यांच्या अंगावर नेली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या फिर्यादीवरून यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीसात दोन ट्रक्टरचालकासह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील तपासाधिकारी सपोनि बीपीन शेवाळे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.

आज न्या. जी.ए. सानप यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता गुन्ह्यातील एकूण 13 साक्षादार, फिर्यादी घनश्याम पाटील, साक्षीदार अनिल सुरवाडे, वैद्यकिय अधिकारी, तपासाधिकारी शेवाळे यांची साक्ष महत्वाच्या ठरल्या यातील आरोपी ट्रक्टर चालक रमेश काशीनाथ सोनवणे आणि गुलाब मोरे, सहकारी आरोपी दिपक संतोष पाटील आणि रविंद्र विक्रम हटकर सर्व रा. जळगाव यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले.

अशी सुनावली शिक्षा
रमेश काशिनाथ सोनवणे आणि गुलाब बाबुलाल मोरे या दोघा आरोपींना
1. कलम 307 सह 34 अन्वये 7 वर्षे सश्रम कारवास व प्रत्येकी 15 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद,
2. कलम 333 सह 34 प्रमाणे दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येक 7 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास चार महिने साधी कैद,
3. कलम 338 सह 34 प्रमाणे 1 वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी 5 हजार रूपये दंङ दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद,
4. कलम 353 सह 34 प्रमाणे 1 वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी 2 हजार रूपे दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद,

विना परवाना चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कलम 379 प्रमाणे दोषी ठरवत रमेश काशीनाथ सोनवणे, गुलाब बाबुलाल मोरे, दिपक संतोष पाटील आणि रविंद्र विक्रम हटकर या चौघा आरोपींना दोन वर्षे सश्रम कारावास आणि 25 हजार रूपये दंड, दंड न भरल्यास  साधी कैद सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. प्रदिप महाजन यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version