Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

dumpar

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील सांगवीजवळ अवैध वाळूची वाहतुक करणाऱ्या एका ट्रकला फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी पकडुन यावल पोलीस स्टेशनला जमा केल्याची माहिती तहसीलदार कुंवर यांनी दिली.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपुर यावल मार्गावरील सांगवी गावा जवळील पेट्रॉल पंपाजवळ आज १७जुन रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी पंपाजवळ उभी असलेल्या वाळु वाहतुक करणारे डंपर क्रमांक (एम.एच. १८ ई ७४०१) हे वाहन वाळुने भरलेल्या अवस्थेत उभे असता मिळुन आल्यावर त्यांनी विचाराणा केल्यावर चौकशी केली असता सदरचा उंपरहा साकेगाव तालुका भुसावळ येथील रंगलाल परदेशी यांच्या मालकीचा सांगण्यात आले.

या उंपरमध्ये साडेतीन ब्रास ८० हजार रुपये किमती वाळु भरलेली मिळुन आली,या वाळु वाहतुकीचा परवाना प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी चालकाकडून पाहील्यावर यावर खाडाखोड असत्याचे निर्दशनास आल्याने प्रांत अधिकारी यांनी तात्काळ सदरचे वाळुची अनधिकृतपणे वाहतुक करतांना मिळुन आल्यावर सदरचे वाहन हे यावलच्या तहसील कार्यालयात जमा करून, वाहनमालक रंगलाल परदेशी यांनी २ लाख ७९ हजार ७६९ रुपये ठंड भरण्याची नोटीस बजावली, उशीरापर्यंत मिळालेल्या माहीतीनुसार वाहन मालकाने सदरचे चलन भरल्याचे वृत आहे. आता प्रश्न असा आहे की यावल तालूक्यात विविध ठीकाणी वाळु माफीयाच्या माध्यमातुन वाळुची अशा प्रकारे तस्करी केली जाते. ही बाब प्रांतसाहेबांच्या निदर्शनास येवु शकते तर मग मंडळ अधिकारी व तलाठी यांना का दिसुन येत नाही ? हा एक प्रश्न आहे.

Exit mobile version