Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाळू माफियांवर कारवाईसाठी हनुमंतखेडे सिम ग्रामस्थांचे उपोषण

walu mafiya erandol

एरंडोल (प्रतिनिधी) वाळू माफियांवर कारवाई करावी या मागणीसाठी तालुक्यातील हनुमंतखेडे सिम येथील ग्रामस्थांनी शनिवारी (दि.२९) सकाळी १०.३० वाजेपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.

आमदार डॉ. सतीश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. त्यांनीच मध्यस्थी करून दुपारी १.३० वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी विनय गोसावी व तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रांताअधिकारी विनय गोसावी यांनी वाळू माफियांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांचे उपोषण मागे घेण्यात आले. अमित पाटील, अनिल पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, अर्जुन पाटील, अशोक पाटील, बंडू पाटील, दीपक पाटील, जगदीश नाईक, भाऊसाहेब पाटील, प्रदीप पाटील, सुभाष कोळी, नारायण कोळी, शरद पाटील आदी सुमारे ५० ग्रामस्थ उपोषणाला बसले होते.

अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी पाचोरा व एरंडोल यांच्या संयुक्त पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन आमदारांच्या उपस्थितीत देण्यात आले. आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे बोलून अवैध वाळु वाहतुक बंद करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. तसेच उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनाही भ्रमणध्वनीद्वारे अवैध वाहतुक बंद व्हावी, यासाठी संबंधीतांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगरसेवक अभिजित पाटील, राष्ट्रवादी सरचिटणीस राजेंद्र शिंदे, संतोष महाजन शिरसमणी, मनोहर पाटील शिरसमणी, जिभाऊ पाटील करमाड, रोहिदास पाटील फरकांडे, ओबीसी सेल शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, एन.डी.पाटील, अनिल अरविंद पाटील, रविंद्र पुंडलिक पाटील, भारत धनराज पाटील, सुनील धनराज पाटील, संजय रामराव पाटील, हणुमंतखेडे सिम गावांतील ग्रामस्थ, तहसिलदार अर्चना खेतमाळीस, नायब तहसिलदार एस.पी. शिरसाठ हे उपस्थित होते.

Exit mobile version