Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाघ नगरातून कार चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला

kar chori

जळगाव प्रतिनिधी । घरासमोर लावलेली इंडीका कार चोरून नेत असतांना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या सतर्कतेमुळे कार सोडून दोन अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कार मालक दिनेश नरेंद्र जाधव (वय-26) रा. हरीविठ्ठल नगर हे खासगी कामाला आहे. त्यांनी घरघुती वापरासाठी इंडीका कार क्रमांक (एमएच 18 व्ही 989) घेतली होती. त्यांनी आपली कार शालक प्रल्हाद आधार मिस्तरी रा. वाघ नगर येथे घरासमोर लावलेली होती. रात्री 12.30 वाजेला सर्वजण झोपले. 12.30 ते 3.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात दोन चोरट्यांनी कैचीच्या सहाय्याने कार सुरू करून रामानंद नगर या भागात येत असतांना तालुका पोलीसांची रात्री पेट्रोलिंग सुरू असतांना अज्ञात चोरट्यांना पोलीसांची गाडी दिसली. त्यांना घाबरून कार वाघ नगर परीसरातील श्याम नगर परीसराजवळ तिथेच सोडून देत अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. वाघ नगर हे तालुका पोलीसांची हद्द असल्याने कार तालुका पोलीसात जमा करण्यात आली. दरम्यान सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास प्रल्हाद मिस्तरी यांना कार जागेवर मिळून आली नाही. त्यांनी तालुका पोलीस स्टेशन गाठले. इंडीका कार आपलीच असल्याचे त्यांनी ओळखले. कार चोरीप्रकरणी रामानंद नगर पोलीसात दुपारी उशीरापर्यंत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version