Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काहीही झाले तरी वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही ; शर्मिला ठाकरेंची आक्रमक भूमिका

sharmila thakre

 

मुंबई (वृत्तसंस्था) वाडिया हॉस्पीटल बंद झाले तर गोरगरीबांनी उपचारासाठी जायचे कुठे? महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन यावर तोडगा काढावा. काहीही झाले तरी हे हॉस्पीटल आम्ही बंद होऊ देणार नाही, असा आक्रमक भूमिका शर्मिला ठाकरे यांनी घेतली आहे. वाडिया रुग्णालातील कामगारांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्या बोलत होत्या.

 

महापालिका अनुदानाची थकबाकी देत नसल्याने हॉस्पीटल बंद करावे लागणार असल्याचा दावा करणारे वाडिया प्रशासन आणि पालिकेने परस्परविरोधी दावे केले आहेत. मागील आठवड्यापासून वाडिया हॉस्पीटलने नव्या रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रियाही थांबवली आहे. अनुदानाअभावी वैद्यकीय सेवा आणि औषधांसह विविध सेवा देणाऱ्या व्हेन्डर्सना पैसे देता आलेले नाहीत. त्यामुळे रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. परंतु काहीही झालं तरी वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी घेतली आहे.

Exit mobile version