Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प. वि.पाटील विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे अंगण झाडून स्वच्छ केले. विद्यार्थ्यांनी त्यावेळी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याविषयी सुंदर अशी भाषणे केली.

प्रसंगी उपशिक्षक कल्पना तायडे,योगेश भालेराव, स्वाती पाटील ,सूर्यकांत पाटील ,दिपाली चौधरी ,सुनील नारखेडे ,सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version