Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वृशांक अहिरे याचा माजी आमदारांकडून सत्कार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुका सहकारी शैक्षणिक संस्थेने पूर्णपात्रे उच्च माध्यमिक विद्यालय, भडगाव येथे एचएससी परिक्षेत विज्ञान शाखेतून पाचोरा येथील वृशांक अहिरे याने ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल माजी आमदारांकडून नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला.

वृशांक याने संपादीत केलेल्या यशाबद्दल त्याचे पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, गो. से. हायस्कूलचे चेअरमन वासुदेव महाजन, नगरसेवक अशोक मोरे, प्राचार्य विश्वासराव साळुंखे, उपप्राचार्य संदीप सोनवणे, पत्रकार शांताराम चौधरी, ए. बी. अहिरे, रहीम तडवी सह उपस्थितांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. वृशांक अहिरे हा पाचोरा येथील गो. से. हायस्कूलचे शिक्षक ए. बी. अहिरे यांचा चिरंजीव आहे.

 

Exit mobile version