Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरीभाऊ बागडेंचे पहिले मतदान ! : विधानपरिषदेसाठी मतदानास प्रारंभ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषदेच्या १० जागांसाठी आज मतदानास प्रारंभ झाला असून माजी विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम आपला हक्क बजावला.

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार उभे असल्याने ही निवडणूक बिनविरोध न होता यासाठीची निवडणूक अटळ झाली. यात भरतीय जनता पक्षाने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाच उमेदवार मैदानात उतारले. शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे तर कॉंग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. प्रत्येक पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत मोर्चेबांधणी करून विजयाचा दावा केला आहे.

दरम्यान, आज सकाळी पहिल्यांदाच भाजप आमदारांची बस विधानभवनात दाखल झाली. पक्षाचे ज्येष्ठ आमदार तथा माजी विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना सर्वात पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. यानंतर भाजपच्या दुसर्‍या आमदारांनी मतदानास प्रारंभ केला आहे. यानंतर आता शिवसेनेच्या आमदारांची बस देखील विधानभवनात आली असून ते आपला हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी सायंकाळी पाच वाजेपासून होणार आहे.

Exit mobile version