Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुदत संपूनही मिळणार मतदार नोंदणीची संधी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मुदत संपूनही नवमतदारांसह इतरांना मतदार नोंदणी करता येणार आहे. राज्य निवडणूक विभागाने नोंदणी राहिलेल्यांना पुन्हा संधी देऊ केली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेकांना आता मतदार नोंदणी, पत्ता बदलणे, नाव बदलणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार असून, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावता येईल.

राज्यात नऊ डिसेंबरला मतदारनोंदणीची मुदत संपली. त्यामुळे अनेकांना तांत्रिक कारणास्तव किंवा अन्य कारणांसाठी अर्ज भरता आला नाही. अशांना निवडणूक विभागाने पुन्हा संधी देऊ केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी नवमतदार; तसेच नाव दुरुस्तीचे अर्ज करण्यात आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा मतदान नोंदणीची संधी मिळेल, की नाही याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

‘राज्यात नऊ डिसेंबरला मुदत संपली. मात्र, नऊ डिसेंबरनंतरही अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत. नऊ डिसेंबरपर्यत भरलेले अर्ज आणि त्यानुसार अंतिम केलेली यादी पाच जानेवारीला प्रसिद्ध होईल,’ अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

Exit mobile version