Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवाशक्तीतर्फे ‘मतदार मदत कक्ष’

WhatsApp Image 2019 10 17 at 1.30.10 PM

जळगाव, प्रतिनिधी | मतदारांना त्यांचे मतदान कोठे आहे हे माहित होण्यासाठी तसेच त्यांची वोटिंग स्लीप मिळविण्यासाठी युवाशक्ती फाउंडेशनतर्फे मतदार मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे मतदार मदत कक्ष सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काव्यरत्नावली चौक, पांडे डेअरी चौक आणि गणेशवाडी येथील सुपारी कारखाना येथे दि. १७ ते २१ ऑक्टोबर पर्यत खुला राहणार आहे. नागरिकांनी मदत कक्षात जाऊन त्यांचे मतदान कोठे आहे त्याची खात्री करून वोटिंग स्लीप घेऊन जावी, मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, मनजित जांगीड, संदीप सूर्यवंशी आदींनी केले आहे.

Exit mobile version