Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात 29 ठिकाणी व्हिव्हिपॅट मशीन नादुरुस्त

VVPAT EC

जळगाव (प्रतिनिधी) राज्यभरात सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना ईव्हीएम बंद पडल्याचे प्रकार समोर येत आहेत. जळगाव जिल्ह्यात देखील 29 ठिकाणी व्हिव्हिपॅट मशीन नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामुळे या सर्व मशीन बदल्यानंतर तब्बल एका तासानंतर मतदानाला सुरुवात झाली होती.

 

सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना ईव्हीएम बंद पडल्यामुळे बराच वेळ थांबून राहावे लागले. यामुळे अनेकजण मतदान न करताच संतापात माघारी परतले होते. चोपडा तालुक्यात दोन केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे उशिराने मतदान सुरू झाले. तर अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर 20 मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले  होते. तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 29 ठिकाणी व्हिव्हिपॅट मशीन नादुरुस्त झाल्यामुळे तब्बल एक तास उशिरा मतदान सुरू झाले होते. या 29 व्हिव्हिपेट आणि 22 बॅलेट यूनिट बदलल्यानंतर मतदान सुरू झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.

Exit mobile version