Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवेकानंद विद्यालयात आषाढीनिमित्त दिंडी सोहळा संपन्न

dindi

चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ‘आषाढी एकादशी’ निमित्ताने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, सचिव अॅड.रवींद्र जैन, डॉ.निता जैस्वाल, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, संजय सोनवणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विठ्ठलाची आरती उपशिक्षक प्रसाद वैद्य, वासंती नागोरे, वैशाली आढाव, वंदना वनारसे यांनी गायली. उपशिक्षिका साधना बोरसे यांनी विद्यार्थ्यांना संतांच्या गोष्टीरूप माहिती व आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी व ज्योती अडावदकर यांनी अभंग गायन केले. उपशिक्षक संजय सोनवणे यांनी पसायदान म्हणून घेतले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची भव्य दिंडी शहरातून काढण्यात आली. दिंडीत लेझीम पथक, टाळ-गजर, विद्यार्थ्यांचा अभंग गायनाचा समूह, इयत्ता सातवी वर्गातील समाज प्रबोधनाचे फलक व वृक्षदिंडी हे दिंडीचे आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. तसेच अनेक विद्यार्थी वारकरी वेशात येऊन विठ्ठलाचा जयघोष करत होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपशिक्षिका आशा चित्ते तर फलक लेखन व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभागाच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात सर्व विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version