Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वित्त आणि विकास महामंळातर्फे थकित कर्जदारांसाठी योजना

karj yojana news

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंळामार्फत इतर मागास प्रवर्गातील बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. महामंडळाच्या विविध कर्ज योजनेतंर्गत लाभार्थ्यांना व्यवसायाकरीता कर्ज पुरवठा केला आहे. कर्ज घेतलेल्या बहुतांश कर्जदारांनी कर्जाची परतफेडीचा कालावधी संपल्यावर देखील कर्जाची परतफेड केलेली नाही.

महामंडळाने रुपये 25 हजाराच्या थेट कर्ज योजनेचे लाभार्थी वगळून अशा थकित लाभार्थी कर्जदारांसाठी एक रकमी कर्ज परतावा योजना सुरू केली आहे. संपूर्ण कर्जाची रक्कम परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रकमेवर दोन टक्के सुट देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा जास्तीत-जास्त थकित कर्जदारांनी लाभ घेवून आपले कर्ज खाते बंद करावे, व कर्जमुक्त व्हावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

वैयक्तिक तसेच गट कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वीत

 महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज परतावा योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या दोन्ही योजना बँकेमार्फत राबवण्यात येणार असून अर्जदाराला महामंडळाच्या वेब पोर्टलवर नोदणी करणे आवश्यक आहे.   सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Exit mobile version