Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रंगपंचमी व्याख्यानमाला अध्यक्षपदी विठोबा पाटील

WhatsApp Image 2019 11 03 at 4.17.21 PM

रावेर, प्रतिनिधी | येथील रंगपंचमी व्याख्यान मालेच्या अध्यक्षपदी विठोबा पाटील आणि सचिवपदी अनिल महाजन यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

रंगपंचमी व्याख्यानमालेचे विश्वस्त दिलीप वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली असून या सभेत व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी विठोबा पाटील यांची तर सचिवपदी अनिल महाजन यांची निवड करण्यात आली. विश्वस्त डॉ. राजेंद्र आठवले यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या व्याख्यानमालेसाठी संभाव्य वक्ते, त्यांचे विषय याबाबत मार्गदर्शन केले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतरच्या पंधरवड्यात व्याख्यान मालेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मावळते अध्यक्ष सचिन जाधव, हेमेन्द्र नगरिया, प्रतिक महाजन, कैलास वानखेडे यांनीही सूचना मांडल्या.

Exit mobile version