Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कृषी विज्ञान केंद्रमार्फत केळी बागेची पाहणी

faijapur

फैजपूर प्रतिनिधी । पाल येथील कृषी विज्ञान केंद्रमार्फत रावेर तालुक्यातील खिरोदा, सवखेडा, उटखेडा, चिनावल, कुंभार खेड भागात केळी पिकावर आलेल्या रोगग्रस्त बागांची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुलै महिन्यापासून कांदा लागवड केलेल्या व ऊती संवर्धित रोपांवर 45 टक्कांपर्यंत सी.एम.व्ही रोगाची लागण झाली असून त्यारोगाची पाहणी केल्यानंतर आढळून आले की, कुकुंबर मोझेक व्हायरस या विषाणू जन्य रोगाची लागण झाली आहे. त्याचा प्रसार प्रादुर्भाव युक्त कांदापासून तयार केलेल्या ऊती संवर्धित रोपे व कंदपासून आणि कापूस पिकावरील मावा कीडव्दारे या रोगाच्या विषाणूचे वहन होत असते. एकदा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी कोणताही ठोस उपाय करता येत नसल्याने या रोगाचा प्रसार होत असतो.

या रोगाची लागवन रोखण्यासाठी केळी बाग स्वछ ठेवणे, प्रादुर्भाव ग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावी तसेच बागेचे 2 ते 3 वेळेस 4 ते 5 दिवसाच्या अंतराने निरीक्षण करून रोगग्रस्त झाडांची विल्हेवाट लावावी. केळी बागेत तण विशेषतः चिवईची भाजी काढून टाकावी, मिरची, वांगी व काकडी आणि इतर पिकांची केळी बागेत लागवड करू नये, मावा या वाहक किडीच्या नियंत्रण करण्यासाठी डायमेथोइट 30 इसी 20 मिली किंवा थायो मिथोकझाइम 25 डँब्लु जी 2 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 एसएल 5 मिली या किडनाशकांची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, अश्या उपाययोजना केल्याने रोगाची लागवन होणार नाही. असे उपाय मार्गदर्शन महेश महाजन (शास्त्रज्ञ- पीक सरंक्षण,के व्ही के,पाल) यांनी सांगितले. खिरोदा, चिनावल, उतखेडा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र पाल येथे संपर्क करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी शेतकरींना केले.

या क्षेत्रभेटी प्रसंगी सुधाकर झोपे, ललित चौधरी, देवेंद्र पाटील, सुहास सरोदे, अशोक चौधरी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version