Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन म्हणजे माँ नर्मदा परिक्रमा- डॉ नि. तु. पाटील

भुसावळ–लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|  माँ नर्मदा किनारी परिक्रमा करत असतांना मला समोरून एक मुस्लिम व्यक्ती दिसली,सहसा परिक्रमा करत असतांना कोणी दिसले तर “नर्मदे हर” म्हणत अभिवादन करायचे असते,पण मुस्लिम असल्याने आवाज देऊ की नाही हा विचार सुरू असतांनाच तेवढ्यात सदर व्यक्तीने मला जोरात ‘नर्मदे हर’ केलं.असा अनुभव आज डॉ.नि.तु. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितला.

 

लक्ष्मी नगर येथील आपले परिवार सार्वजनिक वाचनालय,व रोटरी  क्लब ऑफ भुसावळ  ताप्ती  व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हुतात्मा जीवन संकीर्तन स्मृती सप्ताह”(9ते 15 ऑगस्ट) समाप्ती दिनी कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून  ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर डॉ. रेणुका पाटील, डॉ.रश्मी शर्मा,राजीव शर्मा, मनीषा पाटील,डॉ उदय बॉंडे, श्रीकांत पाटील,विनोद रोटे,वैद्य रघुनाथ सोनवणे, पाटील काका,शांताराम पाटील  आदी उपस्थित होते.

 

पुढे डॉ. नि.तु. पाटील म्हणाले की,परिक्रमा करत असताना आपण प्रत्येक वेळी आश्रमातच राहतो अस नाही तर कधी कधी कोणाच्या घरी पण राहतो.त्यावेळी आपण फक्त एक परिक्रमवासी असतो तर ज्याकडे आपण थांबतो ते माँ नर्मदा मातेचं भक्त असतात.त्यावेळी जात,पात, पंथ याबाबत काहीही संबंध नसतो,त्यामुळेच विविधता मध्ये एकता दर्शवणारी अशी ही माँ नर्मदा परिक्रमा असते.असे विविध अनुभव डॉ. नि.तु. पाटील यांनी कथन केले.

 

यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलानंतर ध्वजारोहण झाले. श्रीकांत पाटील आणि सुशीला पाटील यांनी सत्कराथी तर्फ मनोगत व्यक्त केले.मान्यवरांचा सत्कार झाला तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींचा सत्कार परिक्रमवासी डॉ.नितु पाटील आणि रोटरी  क्लब ऑफ भुसावळ  ताप्ती  व्हॅली चे अध्यक्ष मनीषा पाटील यांच्या हस्ते झाला.  त्यानंतर  तिरंगा सोबत सेल्फी हा उपक्रम झाला.

 

यावेळी प्रास्ताविक शांताराम पाटील, सूत्रसंचालन सुरेश कोल्हे तर आभार प्रदर्शन  सचिन गोसावी यांनी केले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ बारी,मनीषा पाटील,संजय पाटील,शैलेश बह्याटे,नूतन भिरुड, अथर्व भोळे,संजय यावलकर,यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचा शेवट पसायदान म्हणत झाला.

Exit mobile version