Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे विष्णुयाग व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन

Faizpur

 

फैजपूर प्रतिनिधी । शहरात भव्य 27 विष्णुयाग महोत्सव व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन येत्या दि.26 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2020 दरम्यान करण्यात आले आहे. याकरिता सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यकर्ते यांची सभा नुकतीच घेण्यात आले असून प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, प.पु.महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांचे उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी सभेत समितीचे सचिव म.सा.का.संचालक नरेन्द्र नारखेडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व तयारी याबाबत सविस्तर आढावा मांडला. येत्या दि.27 जाने ते 3 फ़ेब्रुवारी याकाळात 27 कुंडी विष्णुयाग होईल आहे. दररोज गाथा पारायण व दुपारी 3 ते 5 प.पु.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे योगी पावन मनाचा याविषयावर प्रवचने होतील. तर रात्री आळंदी व पंढरपूर येथिल थोर कीर्तनकार यांची कीर्तन होईल. या महोत्सवात महाराष्ट्रातील थोर साधू व संत व नाशिक त्र्यबंकेश्वर, काशी, चेन्नई व फैजपुर येथील ब्राह्मण संघ उपस्थित राहणार आहे.

यांनी केले मार्गदर्शन
प.पु.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तनाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. या महोत्सवाचे आयोजन प.पु.प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून मार्गदर्शन प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व प.पु.महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमास प.पु.महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांनी खंडोबा मंदिराचे हाल व आवार विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. सभेत प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व पुरुषोत्तमदास महाराज यांनी नियोजन व कार्यक्रम यशस्वी पार पाडणे बाबत मार्गदर्शन केले.

देणगी व उपस्थिती राहण्याचे आवाहन
उपस्थित सर्व भाविक व कार्यकर्ते यांनी यावेळी देणगी जाहीर करून कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडण्याची संकल्प केली. यावेळी यज्ञात भाविकांनी नांवे नोंद करावी असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास चोलदास पाटील, सी.के.चौधरी, विजय परदेशी, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, योगेश भावसार, डॉ गणेश भारबे, सुनील पाटील, नितीन महाजन, किशोर गुजराती, हिरामण भिरुड यांच्यासह आदि उपस्थितीत होते.

Exit mobile version