Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांची सखोल चौकशी करा (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विशेष सरकारी वकील ॲड. प्रविण चव्हाण यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च रोजी विधानसभेत भाजपाच्या माजी मंत्र्यांना खोट्या गुन्ह्यात कट कारस्थान रचून अडकविण्याचे पुरावे विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेत. या पुराव्यातून विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी माजी मंत्री गिरीष महाजन, सुधीर मुनगुंटीवार, जयकुमार रावल, सुभाष देखमुख, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजपाचे नेत्यांना अडकविण्याचे प्लॉन केला आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांची तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. ॲड. प्रविण चव्हाण यांनी १२५ तासांचे स्ट्रींग ऑपरेशन पोलीसांच्या सहकार्याने षडयंत्र रचले हे शासनाच्या नियुक्ती सरकारी वकीलाद्वारे करणे म्हणजे कायदशीर कारवाईस पात्र असल्याचे स्पष्ट होत आहे. दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (अ)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, युवक अध्यक्ष मिलींद सोनवणे यांच्यासह आदी उपस्थित आहेत.

Exit mobile version