Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विशेष मतदान नोंदणी अभियानांतर्गत सर्वपक्षीय बैठक संपन्न

yaval 2

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज दि. १८ जुलै रोजी सकाळी 11 वाजता विशेष मतदार नोंदणी अभियान अंतर्गत सर्वपक्षीय बैठक पार पडली.

या बैठकीत पुढील काळात येणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण मतदार याद्यावत व अचुक करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातुन करण्यासाठी बिएलओ व पोलीटीकल एजंट यांच्या माध्यमातुन दिनांक २०,२१,२७,२८ या तारखा तसेच दि. १ जानेवारी पासुन ज्याची वय वर्ष १८ पुर्ण झालेले किंवा ज्यांची नावे मतदार यादीत असून त्यात चुक असलेले तसेच मयत मतदाराचे नांव वगळण्याचे काम प्रशासनाचे नेमणुक केलेले बिएलओ हे गावागावात फिरून मतदार यादी वाचन करण्यात येणार आहे. यावेळी त्या गावातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे त्यांना सहकार्य करतील अशी माहिती प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी दिली आहे. या विशेष मतदार नोंदणी अभियानांर्तगत नोंदणीव्दारे तयार झालेल्या मतदार याद्या या १९ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच यावेळी नव्या मतदार याद्यामधील सर्व मतदारांचे मतदान अनुक्रमांक बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ३० जुलैपर्यंत मतदारांनी ६, ७, आणी ८ क्रमांकाचे फार्म आपआपल्या बिएलओ यांच्याकडे द्यावे लागणार आहे. या बैठकीस तहसीलदार जितेन्द्र कुवर उपस्थित होते. बैठकीला भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष डॉ. नरेन्द्र कोल्हे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवि सोनवणे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिरालाल चौधरी, संगायोचे अध्यक्ष विलास चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अरुण गजरे, भाजपाचे पदाधिकारी उज्जैनसिंग राजपुत, कॉंग्रेस शहराध्यक्ष कदीर खान व नासिर खान आदी या बैठकीस हजर होते.

Exit mobile version