Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राणीचे बांबरूड येथे विषारी औषध घेवून तरूणाची आत्महत्या

Crime

जळगाव प्रतिनिधी । विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे घडली याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, इत्बार भिकन तडवी (वय-35) रा. राणीचे बांबरूड ता.पाचोरा याने गावातील मराठी शाळेत विषारी औषध घेवून आत्महत्या केली. नातेवाईक व गावातील तरूणांनी तातडीने खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. बिराजदार यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version