Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विराज कावडीया यांची नागपूर सिनेट निवडणुकीच्या निरीक्षकपदी नियुक्ती

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे सिनेट निवडणूक होत असून या निवडणुकीत शिवसेना – युवासेना सुद्धा निवडणूक लढवीत आहे. नागपूर विधापीठ अंतर्गत येणाऱ्या उमरेड, कामठी, रामटेक या विधानसभेवर निवडणूक निरीक्षक म्हणून जळगाव येथील युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

नागपूर विधापीठ अंतर्गत येणाऱ्या उमरेड, कामठी, रामटेक या विधानसभेवर निवडणूक निरीक्षक म्हणून  विराज कावडीया यांची शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली आहे. २५  ते ३०  नोव्हेंबर दरम्यान उपरोक्त विधानसभा क्षेत्रात उपस्थित राहून सिनेट निवडणुकीत शिवसेना – युवासेनेच्या वतीने विदर्भाच्या युवासेना व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारांच्या सहाय्याने यशस्वीरित्या सिनेट निवडणुकीत मतदान करून घेण्याची मुख्य जबाबदारी कावडीया यांची असणार आहे असे युवासेना  विधानसभा युवाधिकारी अमित जगताप यांनी कळविले आहे.

Exit mobile version