Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; आ. गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । सोमवारी भाजपातर्फे कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जमाबवंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री उशीरा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आ. गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे एकुण ७ ते ८ हजार लोकांचा जमाव जमला होता. दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले. याप्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, आ. संजय सावकारे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पो.कॉ. राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version