लॉकडाऊनचे उल्लंघन : भुसावळात धडक कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात शहरात धडक कारवाई करण्यात आली असून यात मधू डेअरीला २० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात सध्या सक्तीचा लॉकडाऊन सुरू असून जवळपास पूर्ण बाजारपेठ बंद आहे. तथापि, काही व्यावसायिक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली. यात शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील मधू डेअरी सुरू असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बाहेरून दरवाजा बंद असला तरी आतील भागात मिठाई बनविण्याचे काम सुरू होते. येथे बाहेरचे काही कामगार काम करत होते. यामुळे नगरपालिका प्रशासनाने मधू डेअरीच्या संचालकांना २० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, यासोबत शहरातील आनंद नगरातील अरिहंत प्रोव्हीजन, मोहंमदी नगरातील बिलाल किराणा, पूजा कॉम्प्लेक्स जवळचे आर.आर. एंटरप्रायजेस, जामनेर रोडवरील इंदोर गॅरेज आदी दुकानांवर कारवाई करण्यात आली. तसेच शहरात नियमांचे उल्लंघन करून विना मास्क फिरणार्‍यांवर देखील कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपजिल्हाधिकारी किरण सावंत-पाटील व प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे संजय बाणाईते, पंकज उन्हाळे, परवेज शेख, सूरज नारखेडे, चेतन पाटील, विशाल पाटील, किरण मंदवाडे, अनिल मंदवाडे, राजेश पाटील, गोपाल पाली, योगेश वाणी, स्वप्नील भोळे, मयूर भोई, पोलीस कर्मचारी दीपक शिंदे, चारूदत्त पाटील व किशोर पाटील यांच्या पथकाने केली.

 

 

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content