Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन; भाजपा महानगराध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । टॉवर चौकात भाजपाने बुधवारी आंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या महानगराध्यक्षांसह ११ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे कुख्यात अंडरवर्ल्ड माफियांसोबत संबंध असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चा, जळगाव जिल्हा महानगरतर्फे बुधवारी जळगावातील टॉवर चौकात नवाब मलिकांचे प्रतिकात्मक पुतळ्याला चपलेने मार देत पुतळ्याचे दहन करण्यात आले. नवाब मलिक देशद्रोही असल्याचा आरोप करत,  त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

पोलिस विभागाची कुठलिही परवानगी न घेता आंदोलन केले तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडुन लागु करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. आंदोलनादरम्यान भाजपच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तोंडावर मास्क न वापरता कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल कमलेश पाटील  यांच्या फिर्यादीवरून  भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी कार्यकर्ते आनंद सपकाळे, विशाल त्रिपाठी, अजय जोशी जयेश ठाकूर, दीपक साखरे जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे, रेखा कुलकर्णी या ११ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version