Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तुमच्यासोबत नियतीचा ‘विनोद’…कॉंग्रेसमध्ये या उमेदवारी देतो ; चव्हाणांचा तावडेंना टोला

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भाजपाने तिकीट नाकारले. यावरुनच आता काँग्रसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी तावडेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. ताडवेंसोबत नियतीनेच विनोद केल्याचा टोला लगावत त्यांनी काँग्रेसमध्ये यावं मी तिकीट देतो अशी मिश्कील टीका चव्हाण यांनी केली आहे.

 

 

तिकीट कापले जाण्याच्या काही दिवस आधी विनोद तावडे नांदेडला आले होते. अशोक चव्हाण लोकसभेला तोंडावर आपटले आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला होता. याचवरुन आता चव्हाणांनी परतफेड करत तावडे यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘तावडेंसोबत नियतीनेच विनोद केला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये यावं मी त्यांना तिकीट देईल,’ असं चव्हाण म्हणाले. सध्या भजापाचे बोरवलीमधील आमदार असणाऱ्या तावडेंऐवजी यंदा सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे.

Exit mobile version