Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन आणि पाक जबाबदार – विनीत अग्रवाल

vineet agrawal

नवी दिल्ली प्रतिनिधी । दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानीतील प्रदूषणाला चीन आणि पाकिस्तान जबाबदार असल्याचा हवाई शोध भाजप नेत्यांनी लावला आहे. ‘आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारील राष्ट्राने विषारी वायू सोडला असावा, त्यामुळे दिल्लीतील हवा प्रदूषित झाली असावी, असे विधान भाजपचे नेते विनीत अग्रवाल यांनी केले आहे.

दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा सद्या गाजत असताना राजधानीतील प्रदूषणाला चीन आणि पाकिस्तान जबाबदार असल्याचा जावाई शोध भाजप नेत्याने लावला आहे. वायू प्रदूषणामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिल्लीतील शाळांना सुटी देखील देण्यात आली आहे. तर वाहतूकीवरही परिणाम झाला आहे. दिल्लीतील प्रदूषणाचा मुद्दा अतिशय गंभीर होत असताना भाजप नेत्याने यासाठी थेट पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलंय. पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. भीकेचा कटोरा घेऊन पाक जगभर फिरतोय. याच पार्श्वभूमीवर भारताचं नुकसान व्हावं यासाठी पाक प्रयत्न करतोय, असे खळबळजनक विधान भाजपच्या उत्तर प्रदेश व्यापार विभागाचे संयोजक विनीत अग्रवाल यांनी केल आहे.

Exit mobile version